Ad will apear here
Next
पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने ‘नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन’
पुणे : पुणे इंटरनॅशनल सेंटरने(पीआयसी) टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस व नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन यांच्या सहकार्याने यंदा सहावी ‘नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन’ चे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी, दि. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता यशदा संस्थेत हा कार्यक्रम होणार आहे. पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. 

या परिषदेत १७ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील १८ उद्योजक विविध क्षेत्रातले त्यांचे शोध, उत्पादने व सेवा प्रदर्शित करणार आहेत. यात शेती, कचरा व्यवस्थापन, खेळ, स्वच्छता, आरोग्य, अपंगत्व आणि शिक्षण आदी क्षेत्रांचा समावेश आहे. ‘नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन’तर्फे २०१८ मध्ये ‘शेअर्ड सर्व्हिस सेंटर’  सुरु करण्यात येणार आहे. हे सेंटर शोधक,  उद्योजक आणि सामाजिक संस्थांना उद्योग-संबंधित सेवा कमी शुल्क अथवा निःशुल्क पुरवणार आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZTYBU
Similar Posts
‘सामाजिक दायित्वाकडे पाहण्याचा कॉर्पोरेट क्षेत्राचा दृष्टीकोन बदलतोय’ पुणे : ‘सामाजिक दायित्व अर्थात सीएसआर याकडे बघण्याचा उद्योग विश्वाचा दृष्टीकोन गेल्या पाच वर्षांत सकारात्मकरित्या बदलत आहे. ही स्वागतार्ह बाब असून, नजीकच्या भविष्यात उद्योग विश्वातील कंपन्यांनी एकत्रित येत सीएसआरच्या माध्यमातून योजनाबद्ध विकास करण्याची गरज आहे,’ असे मत फोर्ब्ज मार्शलचे सहअध्यक्ष डॉ. नौशाद फोर्ब्ज यांनी व्यक्त केले
‘चित्रपटांमुळे भारत इस्रायल संबंध अधिक दृढ’ पुणे : ‘चित्रपट माध्यमातून भारत आणि इस्रायलमधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ झाले आहेत’, असे मत इस्रायलचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि पटकथाकार डॅन वॉलमन यांनी व्यक्त केले. ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’ तर्फे (पीआयसी) आयोजित करण्यात आलेल्या इस्रायली चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन डॅन वॉलमन यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते
‘बाल संरक्षण योजनांबाबत अचूक निर्देश आवश्यक’ पुणे : ‘वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या अनाथ मुला-मुलींसंदर्भातील प्रश्न आणि एकात्मिक बाल संरक्षण योजना अर्थात ‘आयसीपीएस’ची योग्य अंमलबजावणी याविषयी संबंधित विभागांना अचूक निर्देश देणे गरजेचे आहे,’ असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
विज्ञानाश्रमातील वैज्ञानिक प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद पुणे : पाबळ येथील विज्ञान आश्रमाचे संस्थापक डॉ. श्रीहरी कलबाग यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शनाला राज्यभरातील विद्यार्थी, संशोधक, विज्ञानप्रेमी यांनी मोठ्या संख्येने भेट दिली. २१ संशोधनांचे पेटंट मिळविणारे युवा संशोधक अजिंक्य कोट्टावार यांनी या वेळी उपस्थितांशी संवाद साधला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language